Pages

Friday 25 February 2011

जगणे

उद्देशा साठी जगून मरणं
तर क्षणभर जीवन सार्थ आहे
अहेतुक ऊगाच जगणं मग
शतायुष्य सुध्दा व्यर्थ आहे

स्वतःसाठी पशु ही जगतात
हा त्यांचा स्वभाव धर्म
दुसऱ्‍या साठी जगणे शिका
तर मानव जन्मास अर्थ आहे

जनावराच्या चामड्याला
भाव आहे बाजारात
कवळी मोल हे विकेल जीने
जर पदोपदी स्वार्थ आहे

जेथे वसतो परोपकार
मृत्यूलोक ही स्वर्ग आहे
पर दुःखवर हसणाऱ्‍यांचा
स्वर्ग ही मग नर्क आहे

Wednesday 23 February 2011

मतदार (विडंबन)

(क्षमस्व-बालकवी)
पाच वर्षासी हर्ष मानासी
गडबड होई चोहीकडे
गेला मतदार कुणीकडे ग बाई गेला मतदार कुणीकडे
नेते येती सांगुनी जाती
विकासाचे मग स्वप्ने पडती
थापा मारुन ते भुलविती
आश्वासनांनाही जोर चढे
गेला मतदार कुणी कडे ग बाई गेला मतदार कुणी कडे
प्रचाराच्या बोंबा उठल्या
ब्यानरच्या रांगा नटल्या
झाल्याआडव्या रित्या बाटल्या
कार्यकत्यांना झिंग चढे
गेला मतदार कुणीकडे ग बाई गेला मतदार कुणीकडे
पैसे वाटूनी रातोराती
लांडगेच निवडुन येती
त्यांनी वाटल्या जाती पाती
देशाची या केली माती
करा त्यांचे तोंड काळे
गेला मतदार कुणीकडे

Monday 21 February 2011

कळत नाही

देशात या माझ्या काय घडतय कळत नाही
मुठभरांची बोटे तुपात इतरांना तुकडाही मिळत नाही
समृध्द समाजाची हक्क व असुविधेची ओरड
फाटक्याच्या पोटावर मार तरीही रडत नाही
गरीबी हटाव च्या आल्या योजना
पुढाऱ्‍याची हटली गरीबी
भिकाऱ्‍यात फरक काही पडत नाही
क्रिकेट,सिनेमा वर होतो अब्जोचा खर्च
भुकेल्या च्या घरची चुल मात्र जळत नाही
भ्रष्ट अधिकारी,गुंडा च्या घरी वाहते संपत्ती ची गंगा
चील्लरची गटार सुद्धा रंका कडे वळत नाही
जरी असलास तु जगाचा पोशिंदा
घेतली फाशी तरी तुझ्या वचुन यांचे नडत नाही
या माझ्या देशात काय घडतय कळत नाही