Pages

Tuesday, 30 November 2010

तेव्हा आणि आता

म्हणतात येथे निघत होते सोन्याचे धुर ,
आता येथेच दाटला कसा दरिद्रया चा महापुर.
येथेच जन्मले न्यायाचे निर्भय स्वराज्य,
आता माजला अनाचार न्यायच झाला क्रुर.
भित्रा झाला आता समाज सारा,
तेव्हा निपजले विर आणि शुर.
अश्रु ओघळते दुःखी भारत माता.
थोडे रक्त थोडे आक्रोशाचे सुर

Monday, 29 November 2010

एकदा एका शहरातील सारे पुतळे मध्यरात्री फीरायला निघाले.
फिरता फिरता एका चौथऱ्‍यावर येउन विसावले.
दुःखित मुद्रेने वेदना कथन करायला लागले.
आंबेडकर म्हनाले माझे अनुयायी फक्त दलितच?
फुले म्हनाले आणि मी फक्त माळ्यांचाच ठरलो .
टिळकांना ही शल्य होते कि चित्पावनांनीच मला आपले म्हणले. शेवटी टीपे
गाळीत महात्मा गांधी बोलले,अरे तुमच्या पाठीशी निदान एक जात ,एक धर्म ,एक
संप्रदाय तरी आहे, माझ्या पाठीशि फक्त सरकारी कचेऱ्‍यांच्या भिँती.