Pages

Sunday, 17 October 2010

कलाकार

मी आज आहे मीच ऊद्या पण
मी युग आहे मीच क्षण
मी असेन वा नसेन
माझे गीत या हवेत गातील
माझे शब्द तुझ्या ओठावर असतिल
मीच रंगात मीच रूपात
मीच छायेत मीच उन्हात
माझीच आठवण प्रत्येक क्षणात
मी सांगेन वा नाही बोलनार
पण प्रकाशात मीच चमकनार
चित्रात माझ्या रंगतिल कल्पना
गाण्यात बहरतिल माझ्या भावना
कवितेत कादंबऱ्‍यात माझ्या कामना
वाद्यात छेडील मी सुरांना
अभिनय नृत्यात माझ्या वेदना
शिल्पात माझ्या रचना
आरंभिही मी मीच अस्ताला असनार
मी अमर आहे मी आहे कलाकार
कलाकार कधी मरत नसतो
प्रतिभेच्या रूपाने कलेत श्वास घेत असतो

Friday, 15 October 2010

आरंभ

काळ कधितरी जागृत अवस्थेत येईल.
आणी एका कल्पाचा आरंभ होईल.
वेदना परिणीत होऊन संवेदना बनतील.
कामगार उठेल,श्रमीक पेटेल.
अन्यायाला सुद्धा वाचा फुटेल.
शेतकरी आनंदाचे गीत गायील.
आणी एका कल्पाचा आरंभ होयील.
शोषीत शोषकांच्या मुसक्या बांधतिल.
अन्यायाचे पारडे उलटून न्याय येयील.
जेव्हा दिन हीन कायदा हाती घेयील.
आणी एका कल्पाचा आरंभ होईल.
झोपडीतील दिवा पून्हा तेवेल.
कूपोषित पोर पोटभर जेवेल.
नियती किती सहनशिलता पाहील.
कधितरी कधितरी शिवराज्य येईल.

आभास

भावनेला त्यागून दुर करा मिथ्याला.
भ्रमाला त्यागून स्विकारा नित सत्याला.
थोडी ही माया थोडा विश्वास आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
कशाला करता क्षितीजा ची बात.
ते स्वतःतरी कुठे अस्तित्वात आहे.
थोडीशी जमिन थोडे आकाश आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
नयनमनोहर रूप इंद्रधणूष्याचे.
त्यालाही आधार सुर्य किरनांचे.
काही जलबिंदु काही प्रकाश आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
मृगजळाने कधि तृष्णा भागत नसते.
दिसले तसे तरी वागत नसते.
थोडा दृष्टिभ्रम थोडी आंच आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.

पशु व माणुस

कधी कधी मानस पशु सारखी वागतात.
माकडेच आपली पुर्वज आहेत याची साक्ष देतात.
एक पशु स्वजातीयाचे करीत नसतो भक्षण,
प्रमुख आपल्या टोळीचे करतो रक्षण.
माणवा चे माणवा कडुनच होते षोशण.
दुसऱ्‍याच्या मरणा वर जगण्याचे भूषण.
भाऊच भावांचे जीव येथे घेतात.
कधी कधी माणस पशु सारखी वागतात.
मुके जीव धन्याचे विसरत नसतात उपकार.
सदैव करतात सेवा कधी नसतो नकार.
विश्वासु नरच येथे होतात गद्दार.
अन्यायाने गरिबाला हीच राबवतात.
कधी कधी माणस पशु सारखी वागतात.

Thursday, 14 October 2010

अस्वस्थ जीवन

सुखाने मरण्या साठी,
जीवनभर कष्ट केले .
शेवटच्या घटकेस कळले,
जगायचे मात्र राहून गेले .
दुनिये च्या या यातनेने .
दुःखसागर अफाट भरले ,
नदी प्रवाहा सम ,
सुखा चे क्षण मात्र वाहुन गेले .
घेतल्या होत्या आणाभाका,
सोबतीने जगण्या साठी,
जीवाभावा चे असे कोणी ते ,
आता एकटे सोडुन गेले.
व्यर्थ त्यांच्या नको आठवणी,
स्वतात जे विकुन गेले .
आसवांसाठी आवसान कुठले,
नेत्र ही सुकून गेले .

Tuesday, 12 October 2010

पाणी

दुःखाच्या वेदनेने पापण्यात दाटते पाणी.
आनंदाच्या क्षणी डोळ्यात हसते पाणी.
पावसाच्या वर्ष धारांनी तळ्यात भरते पाणी. दवबिंदुच्या रुपानेही पाना
फुलात साठते पाणी ,
काळ्या काळ्या मेघां मध्ये ही नितळ दाटते पाणी.
पानी हे जीवन आहे सर्वात असते पाणी .
ओळखा मुल्य तयाचे कारण चराचरात बसते पाणी.

Sunday, 10 October 2010

माणसं

काळजात दुःख लपऊन हसतात माणसं , मृगजळाच्या मागे लागुन फसतात माणसं.
दुसऱ्‍याच्या वेदनेवर होतो हर्ष यांना , आपल्याच व्यथेवर का
हळहळतात माणसं . स्वार्थाने आहेत सारी बरबटलेली ,
समाजीकतेच्या वेळी पळतात माणसं . स्वतः च्या भल्यासाठी लावतात
आगी , पण त्यात निष्पाप जळतात माणसं .
आपल्याच हाताने होतो आपला घात , कळत नाही मला अशी का
वागतात माणसं.

माझा देश

माझ्या देशात गरीबी आहे.
दहशदवादी नक्षलवादा पुढे लाचार आहे
पन माझा देश दिलदार आहे.
केँद्रात लुळी पांगळी सरकार आहे.
शंभरात नव्वद बेकार आहे.
पण माझ्या देशात शुद्ध विचार आहे.
पदोपदी भ्रष्टाचार आहे.
भांडवलदारांची लुटमार आहे.
पण चांगले लोक माझ्या देशाचा आधार आहे
.अजून काय वर्णु माझ्या देशाची थोरवी.
लहान मोठ्यां समोर सिग्रेट नाही पीत.
मोठा लहानां समोर वेसन नाही करीत,
विविधतेत एकात्मता हाच एक सार आहे.
पाहूना देवा समान हा शिष्टाचार आहे.
वडीलधाऱ्‍यां च्या चरणी नमस्कार आहे,
हे फक्त येथेच घडु शकतं कारण माझ्या देशात संस्कार आहे