Pages

Friday, 15 October 2010

आभास

भावनेला त्यागून दुर करा मिथ्याला.
भ्रमाला त्यागून स्विकारा नित सत्याला.
थोडी ही माया थोडा विश्वास आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
कशाला करता क्षितीजा ची बात.
ते स्वतःतरी कुठे अस्तित्वात आहे.
थोडीशी जमिन थोडे आकाश आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
नयनमनोहर रूप इंद्रधणूष्याचे.
त्यालाही आधार सुर्य किरनांचे.
काही जलबिंदु काही प्रकाश आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.
मृगजळाने कधि तृष्णा भागत नसते.
दिसले तसे तरी वागत नसते.
थोडा दृष्टिभ्रम थोडी आंच आहे.
बाकी सारा विषयरूप आभास आहे.

0 comments:

Post a Comment