विरांच्या मायभुत हारलास तु कसा॥
घेतलास जन्म वाघीनिच्या पोटी।
कळपात मेंढरांच्या शिरलास तु कसा॥
संकटांच्या पेलल्यास किती मेघ गर्जना।
झिमझीमत्या पावसात विरलास तु कसा॥
नजरेत होती कधी यशाची शिखरे ।
हताश अपयशि येथे ठरलास तु कसा॥
पर दुःखावर हसने हि दुनियेची रीत।
संस्कार लढण्याचे विसलास तु कसा ॥
झटकुन खेद मरगळ लाग कार्याला।
खिन्न ऊदास असा बसलास तु कसा॥
आज आहेत ज्यांचे बोट तुझ्या कडे।
म्हणतील अंतिम विजयी ठरलास तु कसा॥