Pages

Thursday 23 December 2010

आम्ही

दुज्यांचे झेलता अश्रु स्वतःला जाळतो आम्ही।
जरी कोसळले आभाळ करी ते झेलतो आम्ही॥

तसे दुःख कुणा टळले तसा मृत्यु कुणा टळला।
तसे कित्येकदा मरुनी पुन्हा जन्मतो आम्ही॥

विकारी देह हा येथे जरी घेऊनिया आलो।
पुन्हा अवतार देवाचा वसुवर घडवितो आम्ही॥

जरी लाभले ऊभे आयुष्य आम्हा वैराणी।
उरी आनंद भरलेला नशेने झिंगतो आम्ही॥

वणवा

मांडलेला डाव हा मी टाकुनी जाणार नाही।
हार होवो जीत होवो यापुढे माघार नाही॥

मानसाठीच माझी झुंज आहे श्वापदंशी।
भुक माझी वेगळी मी वेदना खानार नाही॥

आग माझ्या आसवांना लाभली आहे पुरेशी।
सर्वही गेले तरी मी हुंदका देनार नाही॥

आसवे माझीच माझ्या पाचवीला पुजलेली।
वेगऴ्या वणव्यात येथे मी कधी जळणार नाही॥

सुर्य केव्हा मागतोका भिक अंधारा समोरी?
अश्यक्य आहे ते कधी होनार नाही॥

Tuesday 14 December 2010

संताप व महाराष्ट्र (वाचा विचार करा)

कधी कधी विचार मनात यायचा कि आपन मराठी भाषेचा,महाराष्ट्राचा,मुंबई चा असा आग्रह का धरतो.प्रादेशिक विचार सोडुन आपल्या देशाचा इतर देशबांधवांचा का विचार करीत नाही.त्यांचा द्वेश का करतो.पण मला कळले की याच प्रादेशिक स्वाभिमानाची,अस्मीतेची आज महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे,महाराष्ट्रेतर इतर संस्कृती आपन आपली म्हणुन आदर करतो पण पंजाबि,गुजराती,दक्षिण भारत ई.लोक मराठी म्हणजे घाटी संबोधतात मराठी संस्कृती म्हणजे डाऊन मार्केट म्हणुन हीनवतात.आणी दिल्ली तिल लांडगे आपल्यालाच देशबंधुत्वाचे धडे देतात.ज्यांना आमचा आमच्या संस्कृतीचा तिटकारा वाटतो त्यांचा का म्हणुन आम्ही त आदर करावा?शेवटी एक विचार येतो आमच्यावर ही परिस्थिती का यावी. खरच आम्ही एवढे निष्क्रिय,नित्कृष्ट,नेभळट आहोत का.कि आमचा स्वाभिमान,अस्मिता,लाज आम्ही गहाण टाकली.कि आम्हाला स्वतःची लाज वाटते.आज आपल्या महाराष्ट्राच्या सर्व महानगरात जे जे मोठे मॉल ,व्यापारी संकुलं,दुकाने या पैकी एक टक्का सुद्धा मराठी माणसाचे नाही.आलीशान बंगले,फ्लँट मधे सर्व अमराठी माणसं राहतात.मराठी माणुस चाळीत झोपडपट्टित कुत्र्या मांजरा सारखा जगतोय त्यात भर यु.पि.बिहाऱ्‍यांची.आणी म्हेणे महाराष्ट्रात राहनारे सर्व मराठी कसले डोंबलाचे मराठी.याच वृत्ती मुळे आम्ही महानगरात अल्पसंख्य होत आहोत.यांना जर महाराष्ट्राचा एवढा पुळका तर जेथे पैसा तेथेच हे दिसतात आणी वसतात कधि एखादा परप्रांतीय शेत मजुर म्हणुन पाहीला का?पाच दहा वर्षे इथे राहीलं आणी तोडकं मोडकं मराठी बोलता आल म्हणजे कुणी मराठी होत नसतं,
क्रमशः

Monday 13 December 2010

महाराष्ट्राची माती

सलाम माझा या मातीला
अन् महाराष्ट्राच्या संस्कृतीला
हूतात्म्यांच्या त्यागाला
मना मनात बसत असतो
क्षणा क्षणात गात असतो
कणा कणात पाहत असतो
या माती चे अंग
नसा नसात वाहत असतो
चराचरात राहत असतो
दिशातदिशात वसत असतो
या मातीचा गंध
फुला फुलात हसत असतो
कलाकलांत ठासत असतो
इंद्रधनुत दीसत असतो
या मातीचा रंग

विचार भ्रमन,स्वामी विवेकानंद,

मानवी घटकांना एकतेच्या सुत्रात ओवणारी आजपर्यंतची सर्वात मोठी प्रेरक शक्ती म्हणजे धर्मच होय.

Monday 6 December 2010

गंध तुझे

प्रिती चे एक फूल मी तुला वाहीले होते
तुझ्या डोळ्यात मी मलाच पाहीले होते

पुर्वी न होती मदहोश ही हवा
श्वासात काही गंध तुझे राहीले होते

आज काहीसे अधीक तेजस्वी चंद्रतारे
प्रितीच्या चांदण्यात मी तुझ्या नाहले होते

होते तराणे जे ओठावर तुझ्या
ते गीत तुज साठी मी गायीले होते

Sunday 5 December 2010

अधुरी प्रेम कहानी

आता फक्त आहेत तुझ्या आठवणी
अन सुराविना ओठावर बेसुर गाणी
पुस्तकात तो सुकलेला गुलाब
रात्री विना फुले जशी रातराणी
ऱ्‍हदयावर केलेस किती तु घाव
पापण्यात उरले फक्त आता पाणी
का खेळलीस भावनांशी माझ्या
ऊरला न भाव कोनताच मनी
गेलीस दगा देऊन परक्यावानी
राहीली अधुरी एक प्रेम कहानी

काळ

काळाने केलेले दुष्ट प्रहार मी पाहीले
आयुष्याचे अनेक चढ ऊतार मी पाहीले
ऊगाच दोष का हातच्या रेषांना
नशिब पालटनारे विचार मी पाहीले
होती जागा इश मंदीरात ज्यांची
त्याच फुलांचे आज बाजार मी पाहीले
ज्यांच्या साठी सर्वस्व अर्पीले
स्वार्थासाठी होतांना गद्दार मी पाहीले
प्राणा हून स्वाभिमान होता प्यारा
त्यांनाच होतांना लाचार मी पाहीले

Saturday 4 December 2010

झाल्या तिन्हीसांझा: घायाळ मन

झाल्या तिन्हीसांझा: घायाळ मन

Friday 3 December 2010

सैनिक

सैनिक आम्ही भारत भु चे
मरणा सह विजय गान गानार आम्ही
देशरक्षिण्या प्रिय तिरंग्याला
रक्ताच्या थेँबाने रंगविनार आम्ही
शहीद होने हाच आम्हा स्वर्ग
मातृभुमी च्या पीकातुन सळसळनार आम्ही
सरणावर नकोत पुष्प माला
फुलाच्या सुगंधातुन दरवळणार आम्ही
नाही आम्हा खंत मरण्याची
येणाऱ्‍या प्रत्येक पीढीत जन्मनार आम्ही

सज्जन सुत्र

सुवर्ण मृतिका
आम्हा सर्व सम
नाही देणे घेणे
संपत्तीशी।
नसे आम्हा हाव
धन दौलतीची
मनी ओढ असे
सकळांची।
सुर्वण तुला होता
गुंजा सवे
उतरतो गर्व
आपोआप।
साधु संत म्हणे
नसो गर्व कोणा
तोची भोवतो
सज्जनांना।